mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार; म्हणाले…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 21, 2025
in राज्य
Breaking! राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत माजी आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू , राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार उपस्थित होते.

यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही असं सांगतात. मग आत्महत्या का करतो? अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक, अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी सरकार वर प्रहार केला आहे. या परिषदेत दीपक केदार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत संताप व्यक्त केला.

…..तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात

ही वेदनाची परिषद, दुःखाची परिषद आहे. दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे. तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात.

मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते. बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले

या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटलं आणि त्यामुळे शेतकरी वाटल्या गेला. शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पडलं. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही. असेहि बच्चू कडू यावेळी म्हणाले.

तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते

लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला भाव मागितला का? सोयाबीनला भाव मागितला का? तुम्ही जात पाहिली. पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात.

सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते.

शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला तर गुढग्यावर येईल सरकार. पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा.

मरण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होऊ शकेल. असेहीबच्चू कडू यावेळीम्हणाले.

….अन् आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी

शेतकऱ्यांना जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल. मोदींनी शंभर लाख गाठी कापसाच्या अमेरिकेतून मागितल्या आहे. कुठे मीडियात बातमी आहे का? या मीडियावाल्यांचे अर्धे मालक भाजपचे आहे. जोपर्यंत मातीची किंमत होत नाही तोपर्यंत जग सुधरत नाही.

गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहर श्रीमंत होतील, अस यांचे हे तत्व आहे. 28 तारखेला आपण नागपूरला जाणार. पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन करून काळे कायदे रद्द करायला लावले आणि आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी.

जेवढी शेतात मेहनत करता त्याच्या एक टक्के आंदोलनात मेहनत करा आणि तुमचं काम होईल. जेव्हा सगळ्या रंगाचे झेंडे घेऊन शेतकरी लढेल त्यावेळेस सुखाचे दिवस येतील. असा विश्वास यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बच्चू कडू

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
Next Post
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; 'एवढ्या' लाखांची मदत मिळणार, 'या' फंडिंग' योजना जाहीर

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा