मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेल्या स्मशानभूमीत जमावबंदीचा आदेशाचा भंग करून साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाणीव असतानाही घरातून विनाकारण बाहेर पडून मानवी जिवीत व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढा येथील जवळपास ५२ लोकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.५ एप्रिल रोजी सकाळी ८ पासून फिर्यादी पोलिस नाईक गजानन पाटील,सहाय्यक पोलिस निरिक्षक मारकड,पोलिस नाईक अमर सुरवसे,पोलिस शिपाई निशिकांत येळे व होमगार्ड असे कोव्हीड १९ या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखण्याकामी मंगळवेढा शहर व बीट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना.
सायंकाळी ४.३० च्या दरम्यान बोराळे नाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीत एका शवास अग्नी देण्यासाठी अजयकुमार सरोज , ज्ञानेश्वर डांगे,राजेंद्र चिंचकर,आण्णा सोमदळे, महादेव चेळेकर,बाळासाहेब नागणे,धोंडीबा कळकुंबे,विश्वास खुनतकर,बंडू उन्हाळे,हणमंत खुनतकर,सुखदेव नागणे,आजीनाथ दांडगे,औदुंबर नागणे,हरी ताड,बापू देवकर,एकनाथ हजारे, सुभाष हजारे,सिध्देश्वर सोमदळे,मच्छिंद्र वाकडे, सतीश इंगळे , प्रविण उन्हाळे , बाळासाहेब काळे , नामदेव नागणे , विजय चेळेकर , गणपत चेळेकर , सुखदेव उन्हाळे , संजय हजारे , दत्तात्रय आसबे , सोमनाथ हजारे , उमेश शिंदे , शिवाजी सोमदळे , ज्ञानेश्वर हजारे , शंकर सोमदळे , सचिन लेंडवे , महेश आवळेकर , सचिन कोंडुभैरी , लक्ष्मण बुरले , सिध्देश्वर भोसले , भारत कळकुंबे , विकास भोसले , दादासाहेब कळकुंबे , चंद्रकांत हजारे , तात्यासो उन्हाळे , महेश नागणे , विजय हजारे , विजय सोमदळे , इन्नूस शेख , महादेव मोरे , अमर हजारे , ज्ञानेश्वर ओमने , बाळासाहेब हजारे , महादेव जाधव आदी ५२ लोक एकत्रीतरित्या तोंडाला मास्क न लावता थांबलेले निदर्शनास आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या संसर्गजन आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करून नागरिकांना बाहेर येण्यास मनाई केली आहे.वरील नागरिकांनी अशा परिस्थितीत घरातून विनाकारण बाहेर पडून बेदरकारपणे मानवी जिवीत व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातकी कृत्य करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज