टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे अन् माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात राजकीय मतभेद सुरू आहेत. पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत परिचारक यांनी दिले.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावात सोमवारी आवताडे यांनी विविध कामांचा शुभारंभ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला परिचारकांची गैरहजेरी होती.
दुसरीकडे काल मंगळवारी सोलापुरात, तसेच अक्कलकोटमध्ये झालेल्या कार्यक्रमात फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही कार्यक्रमात परिचारकांची हजेरी लक्ष वेधून घेत होती.
सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील अनेक विकास कामांचा शुभारंभ झाला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने भाजपच्या आजी-माजी आमदारांनीदेखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
त्यामुळे या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित राहतील की गैरहजर, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. परिचारकांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहून राजकीय चर्चेला आणखी खतपाणी घातले.
दुसरीकडे मंगळवारी होम मैदानावर झालेला लाडकी बहीण योजना अनुदान वाटप कार्यक्रम, तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यक्रमाला मात्र त्यांनी हजेरी लावली. बराच वेळ ते दोन्ही कार्यक्रमात थांबून राहिले. दौऱ्यात त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही संवाद साधला.
पवार यांच्याशी परिचारकांचा संवाद
होम मैदान येथील कार्यक्रमात फडणवीस बोलायला उठले. व्यासपीठावर त्यांचे भाषण सुरू झाले. इतक्यात डाव्या बाजूला बसलेले परिचारक हे त्यांच्या खुर्चीवरून उठले.
मधल्या खुर्चीवर बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसले. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे त्यांनी पवार यांच्याशी संवाद साधला.
पवार यांच्यासोबत परिचारक काय बोलताहेत, याकडे मात्र व्यासपीठावरील इतर नेत्यांचे लक्ष होते. फडणवीस यांचे भाषण संपताच परिचारक जागेवरून उठले अन् त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले.(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज