टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे कॅनॉलपट्टीवर लहान मुलगा शौचाला बसल्याच्या कारणावरून मुलाच्या आईस व इतरांना लोखंडी पट्टीने मारहाण करून
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रामदास विठ्ठल पवार व राहुल चौगुले या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना डोणज येथे घडली.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी भिमाशंकर कल्लाप्पा सदाबसवे यांचे राहते घराच्या पाठीमागे दि. ३० रोजी रात्री ९ .३० वा. फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा
कॅनाल पट्टीवर शौचास बसल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या बहिणीस शिवीगाळ केली.
यावेळी फिर्यादी आई पद्माबाई, भाऊ अनिल असे सर्वजण मिळून बहिणीस तुम्ही का शिवीगाळ केली अशी विचारणा केली असता वरील आरोपीनी हातातील लोखंडी पट्टीने व काठीने मारहाण करून जखमी केले.
तसेच आरोपीने फिर्यादीच्या डाव्या दंडाचा चावा घेत जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास डी. वाय. एस. पी. राजश्री पाटील या करीत आहेत. दरम्यान, मंगळवेढयात एकाच आठवडयात सलग दोन अॅट्रासिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज