mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

यंदा मतदारांची दिवाळी ‘गोड’ होणार! मंगळवेढामध्ये ‘नगराध्यक्ष’ कोण होणार? थेट निवडणुकीचे आरक्षण आज जाहीर होणार; राजकीय उलथापालथ अधिक वाढण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 6, 2025
in मंगळवेढा
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा नगरपालिकेच्या या राजकारणाला आता वेगळी दिशा मिळणार आहे.

कारण आज मंगळवेढा नगरपरिषदेच्या जनतेतून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे, तर बुधवारी नगरसेवक पदांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.

मंगळवेढा नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष होण्याचा पहिला मान स्व.रतनचंद शहा यांनी मिळवला त्यानंतर ओबीसी महिला प्रवर्गातून अरुणा माळी यांनी थेट नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षे विकासाची कामे करताना नगराध्यक्ष नगरसेवक यांच्यामध्ये निवडीनंतर झालेली दरी विसरून अंतिम टप्प्यात विकासाची मोठी झेप घेतली.

मात्र गेली चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासकराज आहे अशा परिस्थितीत कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी अखेर घेण्याचे आदेश दिल्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या.

सध्या नगरपालिकेची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली असून आता थेट नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत आज मुंबईत निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचे लक्ष सध्या या सोडतीकडे लागले.

आरक्षण सर्वसाधारण निघेल या आशेवर आ.समाधान आवताडे यांची बंधू सोमनाथ अवताडे, राष्ट्रवादीचे मतदार संघ अध्यक्ष अजित जगताप, काँग्रेसकडून शहराध्यक्ष अॅड राहुल घुले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, शिवसेना शिंदे गटाचे बाळासाहेब निकम, उद्योजक राहुल ताड हे संभाव्य थेट नगराध्यक्षपदासाठी दावेदार समजले जातात.

परंतु अलीकडच्या काळात निवडणुका ह्या खर्चिक झाल्यामुळे आर्थिक क्षमता असलेल्या उमेदवाराचा शोध घेऊन आणखीन नव्याने कुणाला संधी देणार हे देखील पाहणे गरजेचे आहे.

मात्र ही आरक्षण पदाची सोडत महिला राखीव निघाल्यास तिचे दावेदार कोण होणार हे देखील अधिकपणे चर्चेला जात आहे त्यामध्ये महिला सर्वसाधारणासाठी रतन पडवळे यांच्या देखील नावाची चर्चा या निमित्ताने सुरू झाली.

जर राखीव साठी आरक्षित झाल्यास प्रवीण खवतोडे, प्रकाश खंदारे, खंडू खंदारे, तानाजी जाधव ,युवराज शिंदे या नावाची पण चर्चा सुरू आहे तर महिलेसाठी आरक्षित झाल्यास याच इच्छुकाच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरू आहे.

जर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यास सोमनाथ बुरजे या नावावर चर्चा होत आहेत अशा परिस्थितीत राज्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती यांच्यात निवडणूक होणार की स्थानिक पातळीवर समजस्य भूमिकेतून स्वतंत्रपणे लढवल्या जाणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

राज्यात महाविकास आघाडी असताना पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस हे परस्पर विरोधात लढले त्यामुळे हे समीकरण नगरपालिका निवडणुकीला राहण्याची शक्यता वाटत आहे.

अशा परिस्थितीत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला.अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी ऊस उत्पादकाची बिले, कामगार पगार या गोष्टी समाधानकारक केल्याल्यामुळे कदाचित समविचारीचा प्रयोग स्थानिक स्वराज्यच्या निवडणूकीत होऊ शकतो मात्र तूर्तास तरी अनेक शक्यता वर्तवल्या जात असल्या तरी सर्वांचे लक्ष मात्र आज होणाऱ्या मुंबईतील आरक्षण सोडतीकडे लागले.

निवडणुका रखडलेल्या काळात अनेक पक्ष संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. अनेकांनी पक्षांतर केले आहे, तर काहीजण निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही राजकीय उलथापालथ अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा नगरपालिका निवडणूक

संबंधित बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
Next Post
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

हृदयदावक! बुडणाऱ्या पोराला वाचविताना बापाचा दुर्दैवी मृत्यू: मुलगा वाचला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..