mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मतदान संपताच काँग्रेसने टँकर बंद करून मतापुरती केलेली स्टंटबाजी लोकांच्या लक्षात आली; काँग्रेसने दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ केला; माजी सभापतीचा जोरदार हल्लाबोल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 25, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
ऐन पावसाळ्यात मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात तीव्र पाणी टंचाई; गावकऱ्यांनी केली ‘अमेझॉन’ला पाणी विकत देण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे

अशा गावातील ग्रामपंचायतला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात टँकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मात्र नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित्यामुळे कागदी घोडे नाचविण्याचे खेळ न पाहता काँग्रेसने मतदानाअगोदर ना ‘प्रस्ताव ना कागद’ थेट तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून आम्ही लोकांप्रती किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते,

पण मतदान होताच काँग्रेसने सुरू केलेले पाण्याचे टँकर सर्रास गावातून बंद करत केवळ मते मिळवण्यापुरतेच आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेसने टँकर सुरू करण्याचा स्टंट केला की काय? अशी चर्चा आता गावागावातील भोळ्याभाबड्या जनतेतून होऊ लागली आहे.

काँग्रेसने लोकसभेला मते मिळवण्यापूरते पाण्याचे टँकर सुरू करून जनतेच्या भावनेशी खेळ केला असल्याचे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले की, सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये निवडणूक जाहीर होताच मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारे अनेकजण न केल्याच्या कामाचेही श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते

अनेकजणांनी म्हैसाळचे पाणी, टेंम्भूचे पाणी 24 गावचा प्रश्न मीच सोडवला म्हणूनही उर बडवून घेतल्याचे या मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे

तर आचारसंहिता असतानाही या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींने दिवसरात्र जनतेच्या हितासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत वारंवार जिल्हाधिकारी व प्रशासनाला विनंती करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करा टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करा अशी विनंती करत

भोसे प्रादेशिक योजनेसाठी सुमारे तीस लाखाचा निधी मंजूर करून घेत योजना सुरू ठेवण्यासाठी धडपड करून लोकांना गैरसोय होणार नाही याबाबत वारंवार पाठपुरावा केला तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीपूरते  मतदारसंघात येऊन मोठमोठ्या वल्गना करत तालुक्यातील भोळाभाबडा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करायचा व निवडणूक संपली की आपला पसारा आवरून निघून जायचं हा प्रकार केला आहे.

निवडणुकीपुरतं स्वखर्चातून टँकर सुरू करत लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला हे या सामान्य गोरगरीब जनतेच्या लक्षात आलं असून त्यांच्या भुलभुलैय्याना बळी पडलेली जनता सध्या डोक्यावर हात मारून घेत आहे.

मतदान संपताच टँकर बंद करून मतापुरती केलेली स्टंटबाजी लोकांच्या लक्षात आली असून आगामी निवडणुकीत कोणत्या तोंडाने मतं मागणार हा सवाल मतदार विचारल्याशिवाय राहणार नाहीत असेही सभापती प्रदीप खांडेकर यांनी बोलताना सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पाणी टंचाई

संबंधित बातम्या

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

एकाच दिवशी होणार सोलापूर जिल्ह्यातील 'एवढे' कर्मचारी निवृत्त, सरकारी जन्मतारखेच्या घोळाचा परिणाम; फंड आधी तयार ठेवण्याचे आदेश

ताज्या बातम्या

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..