मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याने सलगर ता.मंगळवेढा येथील ईश्वर सोमनिंग तेली या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी मधून एक लाख रुपयांची तातडीची मदत मिळाली आहे.
सोमनिंग ईश्वर तेली सोलापूर येथील सीएनएस हॉस्पिटल येथे मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती.
आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या तेली यांना मदत व्हावी म्हणून सलगरचे सरपंच बाळासाहेब जाधव आणि रामचंद्र जाधव यांनी भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा यासाठी विनंती केली.
अनिल सावंत यांनी आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांना फोनद्वारे संपर्क करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1लाख रू ची मदत दोनच दिवसात जमा केली.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला तातडीची मदत मिळवून दिल्यामुळे अनिल सावंत यांचे सलगर येथील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
सदरची योजना गरीब रुग्णासाठी वरदान ठरत आहे. आतापर्यंत या योजनेमार्फत खूप गरीब रुग्णांना मदत मिळाली.
त्यासाठी नेहमीच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, अनिल सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल तेली कुटुबीयांनी समाधान व्यक्त केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज