मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
जागतिक मातृदिनानिमित्त सुरसंगम ग्रुप व मंगळवेढा म्युझिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.14 मे रोजी आदर्श माता सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून सदर दिवशी
6 महिलांना आदर्श माता पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे व मंगळवेढा म्युझिक क्ल्बचे अध्यक्ष लहू ढगे यांनी दिली.
सायं.5.30 वाजता शिशुविहार समोरील मैदानात होणार्या या कार्यक्रमात पार्वती महादेव आवताडे यांना स्व.लक्ष्मीबाई बाजीराव काळुंगे स्मृतीशेष, शोभा तुकाराम लवटे यांना स्व. गंगुबाई हनुमान चेळेकर स्मृतीशेष,
रेणुका नागंता दासरी यांना स्व.पार्वती रामा काशिद स्मृतीशेष, सिताबाई अभिमन्यु चव्हाण यांना स्व.लक्ष्मीबाई अंबादास जाधव स्मृतीशेष, सुंदराबाई सिद्राम यादव यांना स्व.अनुराधा लक्ष्मण ढोबळे स्मृतीशेष, सावित्री सिद्राम यादव यांना
स्व.लक्ष्मीबाई जोतीराम गोवे स्मृतीशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी आई या विषयावर व्याख्यान होणार असून आईला समर्पित असणारी
गाणीही सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुरसंगम ग्रुपचे संतोष ढावरे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज