मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत घरनिकी येथे वादावादी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल विभूते यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती माहिती अशी, दि. ३० एप्रिल रोजी तालुक्यातील घरनिकी येथे आंबेडकर जयंतीची मिरवणूक होती.
त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस कॉन्स्टेबल खंडाप्पा हत्ताळी व फिर्यादी हेडकॉन्स्टेबल विठ्ठल विभूते होते.
सदर जयंतीची मिरवणूक रात्री ९ वा जिल्हा परिषद शाळेजवळ आली असता अचानक काही तरूण शिवीगाळ व झोंबाझोंबी करत असल्याचे दिसले.
या वेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सहा ते सात जणांचा एकमेकाला शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असल्याचे दिसले.
याबाबत त्यांनी पांडुरंग रणदिवे, विनोद पाटील, गणेश मोरे, बापू मोरे, किरण इंगळे, स्वप्निल क्षीरसागर, हर्षवर्धन शिंगण यांच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज