mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला देत होते

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 4, 2022
in राजकारण, राज्य
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या चार्जशीटमध्ये हा जबाब नोंदवण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्याबाबत केलेल्या या गौप्यस्फोटामुळे आता परब यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

ईडीने तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट मंत्र्याने बदल्यांसंदर्भातली यादी दिली होती असं म्हटलं आहे.

याबाबत अनिल देशमुख यांना विचारलं असता ती यादी आपल्याकडे अनिल परब द्यायचे असं त्यांनी सांगितलं.

अनिल परब यांनी मला यादी दिली होती आणि तिच यादी त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

बदल्यांच्या संदर्भात गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावं बाहेर काढा असंही तत्कालीन सचिवांना सांगितलं होतं असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

अनिल परब हे तुम्हाला यादी देत होते तर मग ते यादी कुठून आणायचे? असं विचारला असता देशमुख म्हणाले की कदाचित शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे.

आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावं अनिल परब यांच्याकडे देत होते आणि ती यादी तयार झाल्यानंतर माझ्याकडे अनिल परब देत असत असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. त्यातला मुख्य आरोप होता तो म्हणजे सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा.

तर दुसरा आरोप होता तो म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.

हे सगळं प्रकरण कोर्टासमोर आल्यानंतर आणि हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावंही लागलं.

2 नोव्हेंबरला अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले त्यानंतर त्यांची चौकशी करून उशिरा त्यांना अटक करण्यात आली.

आता त्यांनी आपल्या जबाबात बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता पुढे काय काय घडणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.(स्रोत:मुंबई तक)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल परबगृहमंत्री अनिल देशमुखपोलीस बदली

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 22, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 20, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
Next Post
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

मंगळवेढा तालुक्यातील वाळू ठेक्याचे पुन्हा फेर लिलाव होणार? शासनाच्या नवीन धोरणामुळे पेच निर्माण

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा