मंगळवेढा टाईम्स टीम ।
सोलापूर-मंगळवेढा महामार्गालगत बेगमपूर (ता.मोहोळ) इंचगाव दरम्यान एका बंद हॉटेलच्या छताला दोरीने गळफास घेऊन एका माजी उपसरपंचानी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
आनंद दादासाहेब पाटील (वय ६१, रा. ब्रम्हपूरी, ता. मंगळवेढा)असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ब्रम्हपुरीचे माजी उपसरपंच असलेले पाटील यांना मागील कांही दिवसांपासून दारूचे व्यसन होते. आज सकाळी ते आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले होते.
खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत, म्हणून कुटूंबियांनी शोधाशोध सुरू केली होती.
दरम्यान बेगमपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर इंचगावकडे जाणाऱ्या महामार्गाच्या अगदी लगतच परंतु मागील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एका हॉटेलच्या बाहेरील छताला दारूच्या नशेत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे त्यांनी आपल्याकडील दुचाकी महामार्गाच्या साईड पट्टीवर उभी केली होती.कांही अंतरावरच हा प्रकार घडला.गावातील अनेक राजकीय घडामोडीत त्यांचा विशेष सहभाग असे.
त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी,दोन मुले,एक मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेची कामती पोलिसांत नोंद झाली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब दुधे पुढील तपास करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज