mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! नवनीत राणा आणि रवी राणा यांना ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 24, 2022
in राज्य
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स। 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी तात्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला.

मात्र, कोर्टाने 29 एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर फैसला होणारा आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे.

पोलिसांनी रिमांड कॉपीत राणा दाम्पत्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही मागणी लावून धरत राणा यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत.

याची माहिती कोर्टाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत राणा दाम्पत्यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे.

राणा दाम्पत्यांवर खार पोलीस ठाण्यात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजासमाजात तेढ निर्माण केल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत यावेळी पहिल्यांदा युक्तिवाद करतील अशी अपेक्षा होती.

मात्र, राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. त्यांनी राणा दाम्पत्यांवरील गुन्हा चुकीचा असल्याचं सांगतानाच त्यांची अटकही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.

तर, राणा दाम्पत्यांवरील गुन्हा गंभीर आहे. त्यांनी सामाजिक तेढ निर्माण केली आहे. या मागे काही कट कारस्थान होतं का? याचा तपास करायचा असल्याने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. तब्बल 20 मिनिटे हा युक्तिवाद सुरू होता.

राणा दाम्पत्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यावर कोर्टाने येत्या 27 तारखेला त्यांचं लेखी म्हणण्यास मांडण्यास सांगितलं आहे.

त्यानंतर या विषयावर 29 एप्रिल रोजी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिल पर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे.

नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना ऑर्थर रोड तुरुंगात पाठवलं जाणार आहे. मात्र, राणा दाम्पत्य उद्या नियमित न्यायालयात जामीन अर्ज करणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नवनीत राणा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! ई-पीक पाहणी कालावधीस ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात उद्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन; 'या' योजनांची माहिती दिली जाणार

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा