टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील राजकीय दृष्ट्या नावलौकिक असलेल्या शिवणगी विकास सेवा सोसायटीवर आवताडे गटाची सत्ता अबाधित राहिली आहे.
संत दामाजी कारखान्याचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
निवडीनंतर शिवणगी ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चेअरमन अंबादास कुलकर्णी, शिवनगीचे सरपंच मल्लिकार्जुन बन्ने, माजी सरपंच सिद्धार्थ कोळी, रामचंद्र सोमुते, संतोष कस्तुरे, माजी उपसरपंच सिद्धाप्पा पडवळे, माजी सरपंच बाळासाहेब कुलकर्णी, पोलीस पाटील महादेव शिंदे, गुरुराज सारवाड, हणमंत हुगार, ताराप्पा सोमुत्ते, संजय शिंदे, माजी चेअरमन निलाप्पा पडवळे आदीजन उपस्थित होते.
गेल्या 20 वर्षांपासून शिवणगी विकास सेवा सोसायटीवर अंबादास कुलकर्णी यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे.
अंबादास कुलकर्णी यांनी अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
अंबादास कुलकर्णी यांनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जेष्ठ नेते बबनराव आवताडे, आमदार समाधान आवताडे, माजी सभापती विष्णुपंत आवताडे, उद्योजक संजय आवताडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, सभापती सोमनाथ आवताडे आदींनी अभिनंदन केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज