mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंढरपुरात; उद्या पहाटे होणार महापूजा; दोन दिवस असणार संचारबंदी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 25, 2020
in सोलापूर
उपमुख्यमंत्री अजित पवारांना थकवा जाणवू लागल्याने केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल – रुक्‍मिणीच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बुधवारी सायंकाळी येथे आगमन होणार आहे. उद्या गुरुवारी पहाटे मोजक्‍या लोकांच्या व वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्याच्या उपस्थितीत महापूजा केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शासकीय विश्रामगृहाशी निगडित असणाऱ्या एकूण १३९ लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आले आहेत. त्यात सर्व जण निगेटिव्ह आले आहेत.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना यात्रेसाठी पंढरपूरला येण्यास मज्जाव करण्यात आलेला असला तरी दरवर्षीप्रमाणे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आज दि.25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक गुरुवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटे ते पहाटे साडेतीन या वेळात श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

कार्तिकी एकादशी दिवशी मंदिरातील वीणेकऱ्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पैकी एकाला श्री विठ्ठल – रुक्‍मिणीच्या शासकीय महापूजेवेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे.

तो मान यंदा वीणेकरी कवडूजी भोयर व त्यांच्या पत्नी कुसुम यांना मिळाला आहे. 25 ते 27 नोव्हेंबर असे तीन दिवस भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. परंतु 28 तारखेपासून ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या भाविकांना मंदिरात मुखदर्शनासाठी सोडले जाणार आहे.

चंद्रभागा नदीत स्नानासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. तथापि कोणीही वारकरी भाविक अथवा स्थानिक नागरिक नदीकडे जाऊच नये, यासाठी प्रशासनाने काटेकोर उपाययोजना केल्या आहेत.

जिल्हा तालुका आणि पंढरपूर शहराच्या हद्दीवर अशा तीन ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पंढरपूर शहरातही जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

असे असूनही श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि चंद्रभागा नदीच्या सर्व घाटांवर आषाढी यात्रेप्रमाणे बॅरेकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे नेहमी यात्रा काळात लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटात आज नीरव शांतता दिसत होती.

सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव- शिरढोण, आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.

संचारबंदीतून वगळले

दरम्यान, पुढील बाबींना हा आदेश लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. यामध्ये अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खासगी / सरकारी रुग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्‍टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने, ऍम्ब्युलन्स सेवा आणि सारी, आयएलआय आणि कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी / कर्मचारी,

जीवनाश्‍यक सेवेतील आस्थापना, मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक अधिकारी / कर्मचारी, कर्तव्यावर असणारे महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा विभागातील शासकीय अधिकारी / कर्मचारी, पोलिस बंदोबस्तासाठी भोजनालय, पाणीपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा, कार्तिक वारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरूप परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत, असे नमूद केले आहे.(source:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारपंढरपूर

संबंधित बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 8, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
Next Post
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

काय सांगताय! सोने चांदीच्या दरात 3 दिवसात 1800 रुपयांनी स्वस्त

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा