मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सरकारने कोणताही अतिरिक्त मंत्रिमंडळ विस्तार केलेला नव्हता.
मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाचा वेग आणखी वाढवतील असे दिसते आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, असे म्हटले जात आहे.
सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह एकूण 20 मंत्री आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कमाल संख्या 43 अशी आहे. त्यामुळे आता त्यात आणखी 23 आमदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सहा ते सात आणि सरकारमधील सहयोगी भाजपला 16 ते 17 मंत्रिपदे मिळू शकतात, असा अंदाज आहे.
भाजपकडून ‘या’ नावांवर चर्चा सुरु
भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरु आहे. यामध्ये आमदार राजेंद्र राऊत, विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे यांची नावे चर्चेत आहेत.
तर माढा लोकसभा मतदारसंघ तसेच माळशिरस, माढा, आणि करमाळा या विधानसभेच्या मतदारसंघांमध्येही नावे पुढे येऊ शकतात.
केंद्रात वाहतूकमंत्री असलेल्या नितीन गडकरी यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या सुभाष देशमुख यांच्या नावाचा समावेश होऊ शकतो, असा अंदाज आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हेदेखील मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज