टीम मंगळवेढा टाईम्स ।
लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारकडून महिलांना आणखीन एक भेट देण्यात येणार आहे. महिलांना चार तासांचा पार्ट टाइम जॉब देणार आहे. यासाठी महिलांना 11 हजार रुपये मानधन देखील मिळणार आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर ही योजना महिलावर्गात चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे. मात्र या योजनेतून महिलांना रोजगार मिळत नाही, महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती.
आता राज्य सरकारने यावर देखील नवीन योजना आणायचा निर्णय घेतला आहे. यात महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. चार तासांच्या या अर्ध वेळ नोकरीसाठी महिलांना 11 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
यासोबतच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देखील महिलांना दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे.
त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज