टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे ते मंगळवेढा या मार्गावर मोटर सायकलवर बसून निघालेल्या एका ६० वर्षीय महिलेच्या साडीचा पदर
मोटर सायकलच्या चाकात अडकून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून ती मयत झाली असून छबाबाई बलभिम लेंडवे असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत छबाबाई लेंडवे (वय ६० रा. लेंडवे चिंचाळे) ही मयत महिला दि.१७ जानेवारी रोजी ५.३० वाजता लेंडवे चिंचाळे हून मंगळवेढ्याकडे येत असताना बलभिम लेंडवे यांचे सोबत मोटर सायकलवर पाठीमागे बसून जात असताना
सदर महिलेचा साडीचा पदर मोटर सायकल मध्ये अडकून खाली पडून डोकीस मार लागल्याने मयताचा भाऊ संभाजी इंगवले यांनी उपचारासाठी मिरज येथे दाखल केले होते.
मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शून्य क्रमांकाने मिरज पोलीसांकडून मंगळवेढा पोलीस ठाण्यात ही अपघाताची घटना नोंद झाली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार साळुंखे हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज