टीम मंगळवेढा टाईम्स (कोल्हापूर)
अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंधातून दोन मुलांना जन्म देण्यास भाग पाडल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत पती संतोष कट्टीमणी याच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षांची असताना १५ जुलै २०२३ रोजी संतोष कट्टीमणी याच्याशी तिचा विवाह झाला. अल्पवयीन असतानाही पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली.

सुरुवातीला मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एका खासगी रुग्णालयात तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. सध्या या मुलाचे वय दोन वर्षे आहे.

या प्रकारानंतरही पीडिता सासरी असताना पतीने पुन्हा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. ऊस तोडणीच्या कामासाठी कर्नाटक राज्यातील अथणी येथे गेलेले असतानाही तिने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले.

अशी उघड झाली घटना
१३ जुलै २०२६ रोजी रात्री पीडितेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तत्काळ तिला रुग्णवाहिकेतून कोडोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिथे १४ जुलै रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. या गंभीर प्रकाराची दखल घेत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर अधिक तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













