mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; डॉक्टरांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली? तालुक्यात खळबळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2024
in आरोग्य, क्राईम, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सांगोला शहरातील फॅबटेक कॉलेज वसाहतीत राहणारे व पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या ३५ वर्षाच्या ऋचा सूरज रुपनर यांनी राहत्या घरी गुरुवारी सकाळी पावणेसातच्या पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सांगोला व पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साळे यांनी एमएलसीद्वारे कळवले की,

डॉ. ऋचा यांनी फॅबटेक कॉलेज वसाहतीत गळफास घेतल्याने सूरज भाऊसाहेब रुपनर यांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे सकाळी पावणेसातच्या सुमारास दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी ऋचा रुपनर यांना तपासून पाहिले असता त्या उपचारापूर्वीच मृत झाल्या होत्या. त्यावरुन पोलिसांनी अकस्मात मृत दाखल करून पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे पुढील तपास दिला.

सपोनी जगताप यांनी सांगितले की, मृताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात न करता सोलापूर येथे इन कॅमेरा करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे, त्यानुसार शवविच्छेदन सोलापूर येथे करून रात्री आठच्या सुमारास अंत्यविधी पंढरपूर येथे करण्यासाठी नातेवाइकांनी मागणी केली.

त्यानुसार अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे. डॉ.ऋचा यांचे पंढरपूर येथे गाडगे महाराज चौकात फॅबटेक हॉस्पिटल आहे.

सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे पती सूरज हे डॉक्टर असून दोघे पती-पत्नी पंढरपूर येथे हॉस्पिटल चालवीत होते. त्यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

डॉ.ऋचा यांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याबाबत तर्कवितर्क केला जात असून या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टर आत्महत्या

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

गरजू रुग्णांना उपचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; सिध्देश्वर आवताडे परिवाराकडून वाढदिवसाचा अनोखा सामाजिक पॅटर्न

November 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

November 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 29, 2026
Next Post
जोपर्यंत ‘त्या’ तलाठ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; प्रहार संघटना आक्रमक; तलाठ्यावर कारवाई का होत नाही?

जोपर्यंत 'त्या' तलाठ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; प्रहार संघटना आक्रमक; तलाठ्यावर कारवाई का होत नाही?

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा