टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तहसील कार्यालयात नशेत तर्र असणाऱ्या तलाठ्याच्या विरोधात मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.
कारण मंगळवेढा तहसीलदारांनी तलाठ्याची पाठराखण केली आहे तो तलाठी दिवसभर दारूचे नशेत होता प्रत्येक व्यक्ती व महिलांना अर्वाच्च भाषा वापरत होता.
त्या दिवशी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना तो उलट-सुलट बोलला त्यामुळे प्रहार संघटना लगेच नायब तहसीलदार यांना भेटली त्या दिवशी त्यांनी कारवाई करतो असे सांगितले पण पाच महिने झाले तरी त्यांच्यावर कारवाई नाही.
त्यामुळे मंगळवेढा प्रांत यांना दोन वेळा पत्र दिले पण त्यांच्या पत्रालाही केराची टोपली तहसीलदारांनी दाखवली त्यामुळे प्रहारला कारवाईचे पत्र मिळाले नाही त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे आणि आंदोलन सुरू केले.
पण या आंदोलनाकडे प्रांताधिकार्यांना उत्तर देता येत नाही व तहसीलदार कारवाई टाळत आहेत त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चुप अशी अवस्था प्रांत व तहसीलदार साहेबांची झाली आहे हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी घेतली आहे.
यावेळी आंदोलन करते जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी ,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील ,तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे ,शहराध्यक्ष युवराज टेकाळे, अनिल दोडमिसे, अजय राठोड ,निवेदक धनंजय माने,
बालाजीनगरचे संजय राठोड ,कैलास हेगडकर ,संजय वाघमोडे ,तानाजी पवार ,कृष्णा लिगाडे ,राहुल खंडेकर ,दिनेश बिराजदार , नवनाथ मासाळ, नागेश मुदगुल या आंदोलनात सहभागी आहेत हे आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे करणार आहे असे आंदोलन कर्ते सिदराया माळी यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज