टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे येथील विशेष शाखा परिमंडल-2 या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस हवालदार हरी कृष्णा मोरे (वय 53) हे त्यांच्या मरवडे ता.मंगळवेढा येथील मूळ गावी
रजेवर आले असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना ह्दयविकाराचा झटका येवून मयत झाले असल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.
पोलिस हवालदार हरी कृष्णा मोरे हे मूळचे मरवडे येथील असून ते पुणे येथे विशेष शाखा परिमंडल -2 मध्ये नेमणूकीस होते.
दि.26 ते 31 ऑक्टोबर अखेर त्यांनी किरकोळ रजा काढून मरवडे येथे आले होते.दि.28 रोजी रात्री 9.00 वा.
घरी असताना त्यांना अचानक छातीमध्ये दुखायला लागल्याने त्यांच्या मुलाने मंगळवेढा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.
दि.31 रोजी रात्री 2.00 वा.अचानक ह्दयविकाराचा झटका आल्याने ते मयत झाले असल्याचे मुलगा तुषार मोरे यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे.
याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलिस करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज