मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथून एक 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या 7 वर्षीय मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या कुटुंबियाने पोलिसात नोंदविली असून पोलिस त्या विवाहित महिलेचा कसून शोध घेत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील बेपत्ता विवाहित महिला मरवडे येथून दि.26 रोजी दुपारी 4.00 वा. माइया पतीचा फोन आला असून आपण सोबत राहू या,
मुलीस घेवून ये असा निरोप माहेरच्या कुटुंबियांना देवून ती सासरी जाते असे सांगून बाहेर पडली.
ती रात्री उशीरापर्यंत शोधाशोध करूनही मिळून न आल्याने दुसर्या दिवशी नातेवाईकाकडे दिवसभर शोध घेतल्याने ती बेपत्ता झाली असल्याची भावास खात्री पटल्याने तीच्या भावाने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
तीचे वर्णन-नेसणेस गुलाबी टॉप व काळी पँट,रंग सावळा,केस काळे,अंगाने मध्यम,उंची 5 फुट,शिक्षण 11 वी पास,सोबत 7 वर्षीय मुलगी अंगाने मध्यम,रंग सावळा,
अंगात नेसणेस काळी पँट व टॉप अशा वर्णनाची महिला मुलीसह कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज