टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातील दोन 11 वर्षीय अल्पवयीन मुलींना तुम्ही आम्हाला आवडता,आमच्याशी मैत्री करचाल का? असे म्हणून त्यांच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी
नवनाथ प्रकाश पवार व राम मल्लिनाथ जाधव उर्फ काळया या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,पहिल्या घटनेत दि.14 रोजी दुपारी 1.00 वा. बालाजीनगर माध्यमिक आश्रम प्रशालेलगत असलेल्या शेतात
आरोपी नवनाथ पवार याने पिडीत मुलीस तु माझी होशील का असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याचे पिडीताच्या कुटुंबियाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तर दुसर्या घटनेत आरोपी राम मल्लिनाथ जाधव उर्फ काळया याने अन्य एका 11 वर्षीय मुलीस तु मला आवडते, माझेसोबत मैत्री करशील का? व शरीराशी झोंबाझोंबी करून
मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या दोन्ही गुन्हयामध्ये बाललैंगिक अत्याचार व अनुसुचित जाती अनुसुचित जमाती कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पंढरपूर विभागाचे डी.वाय.एस.पी.विक्रम कदम हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज