टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला असून त्या अज्ञात व्यक्तीचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,बालाजीनगर येथे दि.14 रोजी सायंकाळी 6.00 वा.राहते घरासमोरून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून
आई वडीलांच्या रखवालीतून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज