टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावातून 27 वर्षीय विवाहिता राहते घरातून रात्रीच्यावेळी बेपत्ता झाली असल्याची तक्रार तीच्या पतीने मंगळवेढा पोलिसात दिली असून पोलिस त्या महिलेचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील खबर देणारे हे रड्डे ता.मंगळवेढा गावातील असून बाहेरगावी ग्रामसेवक असून त्यांचा विवाह 10 वर्षापुर्वी झाला आहे.
दरम्यान विवाह झाल्यापासून कोणत्याही कारणासाठी पत्नीशी भांडण तंटा झाला नव्हता.
मात्र पत्नीकडे मोबाईल सापडल्यामुळे तीच्याकडे पतीने विचारपूस केली असता तीने काही याबाबत सांगितले नसल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.
दि.24 रोजी रात्री जेवण करून कुटुंबातील सर्व झोपी गेले होते. पहाटे 3.00 च्या सुमारास यातील खबर देणारे उठले असता पत्नी घरात झोपलेल्या ठिकाणी दिसून आली नाही.
म्हणून तीचा नातेवाईक व सासुरवाडीकडे विचारपूस करून शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
तीचे वर्णन उंची 5 फुट,अंगात नेसणेस पंजाबी ड्रेस,अंगाने सडपातळ,भाषा मराठी व कन्नड येते
अशा वर्णनाची तरूणी कोणाच्या दृष्टीस आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिस ठाणेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज