मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
इंडिगो विमान कंपनीने आपल्यासाठी शानदार ऑफर आणली आहे. जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त 3499 पूर्ण होऊ शकणार आहे. इंडिगो अब्रॉड सेलची ऑफर 18 फेब्रुवारीला लाँच झाली आहे. तसेच, ही ऑफर 21 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तिकीट बुकिंग केल्यानंतर 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या दरम्यान प्रवास करता येणार आहे.
कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, या सेलमध्ये आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये 2.5 लाख सीट आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. इंडिगोच्या दररोज विविध ठिकाणाहून 1500 फ्लाइटचे उड्डाण होत असते.
गेल्या काही दिवसांपूर्वी इंडिगोने विदेशात जाणाऱ्या उड्डाणांसाठीची dual-aisle Airbus 330 एअरक्राफ्ट उतरण्याची योजना रद्द केली आहे. एअरलाइन युरोप आणि लंडनच्या उड्डाणांसाठी single-aisle 321 XLR (एक्स्ट्रा लॉन्ग रेंज) विमानांचा वापर करण्याची शक्यता आहे.
हे विमान 2023-24 मध्ये इंडिगोला मिळणार आहेत. इंडिगोच्या ताफ्यात ज्यावेळी हे विमान येईल, त्यावेळी भारत ते लंडन आणि पॅरिस यासारख्या युरोप शहरांच्या तिकीट दरात मोठी घट होईल. दरम्यान, यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज