मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील ‘महाविकास आघाडी’ सरकारने घोषित केल्यानुसार कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्यांवरील भार हलका करण्यास प्रारंभ झाला असून कर्जमाफीच्या दुसर्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील 13 हजार शेतकर्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. येत्या 24 तासांत त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.
‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेची दुसरी यादी शनिवारी सकाळी शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 13 हजार शेतकर्यांच्या आधारकार्डचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून या शेतकर्यांच्या खात्यांवर 24 तासांच्या आत रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 80 हजार 786 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 771.62 कोटी रुपयांची टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होणार आहे. त्यापैकी 79 हजार 311 शेतकर्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शेतकर्यांचा समावेश आहे. शासनाने कर्जमाफीची पहिली यादी डेमो म्हणून 24 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये जिल्ह्यातील वेळापूर व मंद्रुप या गावातील शेतकर्यांना लाभ मिळाला होता. या यादीमध्ये 127 शेतकर्यांचा समावेश होता. त्यानंतर शासनाने शनिवारी सकाळी कर्जमाफीची दुसरी यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. ही यादी ओपन झाल्यानंतर आधारकार्ड, बँक पासबुक पहावे लागत आहे. त्यासाठी यादीमध्ये कर्जमाफीस पात्र शेतकर्याचे नाव, रक्कम पाहून त्यानंतर शेतकर्यांच्या हाताचे ठसे घेऊन आधारकार्ड प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
‘डीसीसी’ बँकेमध्ये आधारकार्ड प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकर्यांची गर्दी दिसत होती. मात्र, आधारकार्ड प्रमाणीकरण करण्यासाठी बराच वेळ लागत होता. शासनाची कर्जमाफीची वेबसाईट खूपच सावकाश असल्यामुळे एका शेतकर्याची कर्जमाफीची संपूर्ण माहिती भरण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागत होती. त्यामुळे शनिवारी कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधारकार्ड प्रामाणिकरणानुसार कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांच्या खात्यांवर चोवीस तासांच्या आत पैसे जमा केले जाणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज