टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.आज 18 नव्या रुग्णांची वाढ झाली असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 189 वर गेली आहे. तर दिलासादायक बातमी म्हणजे आज एकाच दिवशी 61 जण कोरणा मुक्त होऊन घरी गेले आहेत.
आज दिनांक 30/09/2020 रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 98 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 98 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 17 आणि निगेटिव्ह 81 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक मौजे मंगळवेढा 12, दामाजीनगर 2, लेंडवेचिंचाळे 1 , खुपसंगी 1 , ब्रम्हपुरी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चा 1 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर येथील कोरोनो रूग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 888 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोला शहर व तालुक्यात आज 36 नवीन कोरोना रुग्णांची नोंद ; दोघांचा मृत्यू
सांगोला शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असुन आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जवळा आणि मांजरी येथील प्रत्येकी 1 पुरूष उपचारादरम्यान मयत झाले आहेत.
आज दिनांक 30/09/2020 रोजी नागरिकांचा स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज दिनांक 30/09/2020 रोजी 208 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 208 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह -36 आणि निगेटिव्ह -172 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरीक हे सांगोला 16 , कटफळ -2 , वाकी घे. 1 , वासुद 2 , गोडसेवाडी 1 , हलदहिवडी 1 , शिरभावी 3 , जवळा 1 , एखतपूर 2 , मांजरी 3 , सोनंद 1 , ढाळेवाडी 1 , खिलारवाडी 1 , चोपडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वव ( RT – PCR )चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 848 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 846 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 974 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज