टीम मंगळवेढा टाईम्स | सोलापूर
व्हॉट्सअॅप कॉलिंग, चॅटिंगद्वारे बनावट कोटेशन मागवणे आणि आरटीजीएसचे खोटे स्क्रीनशॉट पाठवून परस्पर माल लांबवण्याची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. या जाळ्यात अडकल्याने शहरातील एका हार्डवेअर व्यापाऱ्याची ३.८० लाख रुपयांची फसवणूक झाली.

सोलापूर शहरातील एका नामांकित इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर व्यावसायिकाला भामट्याने मोठ्या बांधकाम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून जाळ्यात ओढले.

आरटीजीएस केल्याच्या बनावट पावत्या व्हॉट्सअॅपवर पाठवून त्याने विश्वास संपादन केला. खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री न करताच व्यापाऱ्याने स्थानिक ट्रान्सपोर्टच्या वाहनातून १ लाख ८० हजार आणि दुसऱ्या खेपेत १ लाख ८८ हजार रुपयांचा माल पाठवला.

तिसऱ्या खेपेला हिशेब तपासला असता खात्यात पैसे जमा झाला नसल्याचे उघडकीस आले. दिलेला माल लातूर व बेळगाव येथून लंपास केले.

अशी चालते फसवणूक
गुगल मॅप्स, स्ट्रीट व्ह्यूवरून दुकानांचे फलक, जीएसटी आणि संपर्क क्रमांक टिपणे. प्रत्यक्ष फोन न करता केवळ व्हॉट्सअॅप चॅटिंगवरून मोठ्या मालाची ऑर्डर देणे.

आरटीजीएसचे बनावट स्क्रीनशॉट पाठवून स्थानिक ट्रान्सपोर्टद्वारे माल परस्पर उचलणे. लातूर, बेळगावसारख्या ठिकाणी मालाची दिशा बदलून स्थानिक रिक्षांतून तो गायब करणे.

ट्रान्सफर रिसिटवर विश्वास ठेवू नका
समाजमाध्यमांवर आलेल्या ट्रान्सफर रिसिटवर विश्वास ठेवू नका. बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झाल्याशिवाय माल पाठवू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मोठ्या ऑर्डरची प्रत्यक्ष खात्री करा. संशय आल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधा.-अविनाश पाटील, सायबर तज्ज्ञ, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












