टीम | मंगळवेढा टाईम्स
आम्ही सोलापूरचे पोलिस असून, मंगळवेढ्यात नुकताच खून झाला आहे’ अशी बतावणी करत दोन भामट्यांनी हातचलाखीने वृद्ध शेतकऱ्याचे तब्बल १ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
मारापूर येथील शेतकरी सिद्धेश्वर यशवंत यादव हे शनिवारी (दि. १२) दुपारी दीडच्या सुमारास मंगळवेढा येथील भाजी मंडईत भाजीपाला आणण्यासाठी मोटारसायकलवरून आले होते.

त्यानंतर पेट्रोल भरण्यासाठी पंढरपूर रोडवरील पेट्रोलपंपाकडे जात असताना दुपारी तीनच्या सुमारास भुसे मशिनरी दुकानासमोर दोन अनोळखी इसमांनी त्यांना हात दाखवून थांबविले.

त्यांनी आपण सोलापूरचे पोलीस असल्याचे सांगत मंगळवेढ्यात खून झाल्याची भीती घातली. तसेच अंगावरील सोने सुरक्षित राहण्यासाठी कागदात गुंडाळून ठेवायला सांगून यादव यांचा विश्वास संपादन केला.
एका त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीस्वारालाही त्याच पद्धतीने अडवून सोन्याचे दागिने कागदात काढून घेण्याचा बनाव त्यांनी केला.

दुचाकी अडवून एकाची सोन्याची अंगठी काढून घेतली
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील कारखाना पाटीजवळ वडदेगावचे दिलीप रामकृष्ण सुरवसे (वय ६४) यांनाही याच भामट्यांनी अडवून त्यांची ३० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लांबविल्याचे समोर आले. एकाच दिवशी दोन नागरिकांची फसगत झाल्यामुळे मंगळवेढा शहरात आणि ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, दोन्ही संशयित आरोपी मळकट पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घातलेले, मराठी भाषिक असून पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर यांच्या पथकाकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











