टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर
ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (VSTF) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘आकांक्षित आणि शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये ग्रामीण उपजीविका बळकटीकरण’ या विशेष प्रकल्पाखाली सोलापूर जिल्ह्यातील

चार तालुक्यांमध्ये एकूण १२ कृषी अवजार बँकांची स्थापना केली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे सहज उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोंदणीकृत समुदाय आधारित संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

योजनेचे मुख्य तपशील:
निवडलेले तालुके: माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर.
बँकांची संख्या: प्रत्येक तालुक्यात ३ याप्रमाणे एकूण १२ कृषी अवजार बँका स्थापन होणार.

अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तसेच व्हीएसटीएफच्या (www.mvstf.org) आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या (www.zpsolapur.gov.in) अधिकृत संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध.
अर्ज सादर करण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ (कार्यालयीन वेळेत).

अर्ज कुठे सादर करावा: सर्व आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वेळेत जमा करणे बंधनकारक आहे.

या योजनेत परिस्थितीनुसार पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अथवा योजना रद्द करण्याचे सर्व अधिकार ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.
पात्र व इच्छुक समुदाय आधारित संस्थांनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
















