टीम मंगळवेढा टाईम्स :
संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या विकासाला गती देण्यासाठी आता खुद्द मंगळवेढेकर सरसावले आहेत.

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या या भूमीचा विकास अपेक्षेप्रमाणे न झाल्याने, आता राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा निर्धार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

विकासासाठी निश्चित केलेले प्रमुख प्राधान्यक्रम
पाणी आणि स्वच्छता: शहरासह परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवणे आणि दर्जेदार स्वच्छता यंत्रणा राबवणे.

पायाभूत सुविधा व रस्ते: अंतर्गत तसेच बाह्य रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियोजन आणि शहराचे सुशोभीकरण.
शिक्षण व रोजगार निर्मिती: तरुणांसाठी स्थानिक पातळीवर कौशल्य विकास केंद्रे आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.

उद्योग व पर्यटन विकास: तीर्थक्षेत्र आणि ऐतिहासिक वारसास्थळांचा विकास करून धार्मिक पर्यटनाला चालना देणे व स्थानिक उद्योगांना बळ देणे.

सांस्कृतिक संवर्धन: संतांच्या विचारांचा वारसा जपत नव्या पिढीला जोडणारे उपक्रम राबवणे.
केवळ तक्रार नको, उपायांसह पाठपुरावा करूया
विकासाची जबाबदारी केवळ प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींवर न सोडता प्रत्येक मंगळवेढेकराने सक्रिय नागरिक म्हणून पुढे येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. समस्या केवळ मांडून न थांबता, त्यावर व्यवहार्य उपाय शोधून प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची लोकचळवळ उभारली जात आहे.

”मंगळवेढे भूमी संतांची, गावासाठी कायपण!” हा निर्धार करत सर्व स्तरांतील नागरिकांना या सकारात्मक परिवर्तनाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














