mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 24, 2026
in राज्य, शैक्षणिक
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

टीम मंगळवेढा टाईम्स। 

खासगी कोचिंग सेंटरच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्रे (नोंदणी व नियमन) अधिनियम, २०२६ या मसुद्यानुसार कोचिंगचे वर्ग दिवसाला जास्तीत जास्त पाच तासच घेता येणार आहेत. १३ वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही. शुल्क, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, समुपदेशन आणि मानसिक आरोग्याबाबतही नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये सरकारकडून या मसुद्याचा विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रस्तावित कायद्यानुसार खासगी कोचिंग सेंटरची नोंदणी करणे बंधनकारक असेल. विद्यमान केंद्रांना कायदा लागू झाल्यानंतर सहा महिन्यांत नोंदणी पूर्ण करावी लागेल. नोंदणी तीन वर्षासाठी वैध असेल.

कोचिंग सेंटरच्या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र नोंदणी आवश्यक असेल. २५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांनाही या नियमनाच्या कक्षेत आणले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी असतील? कशा सुविधा

प्रत्येक विद्यार्थ्यामागे किमान एक चौरस मीटर जागा असणे आवश्यक असेल. अग्निसुरक्षा आणि इमारत सुरक्षा प्रमाणपत्र, पुरेसे वायुवीजन, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रथमोपचार सुविधा आणि वाहनतळाची व्यवस्था करावी लागेल.

तळघरात कोचिंग सेंटर चालवता येणार नाही. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागतील. त्याचे चित्रण किमान एक महिना जतन करावे लागेल.

मानसिक आरोग्यावर विशेष भर

कोचिंग सेंटरमध्ये समुपदेशन व्यवस्था उभारणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्याची तरतूद आहे.

प्रवेश निश्चित होत नाही, हेही सांगा

प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित परीक्षेची कठीणता आणि अभ्यासाची तीव्रता विद्यार्थ्यांना स्पष्ट करावी लागेल. कोचिंगमध्ये प्रवेश घेतल्याने स्पर्धा परीक्षेत यश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित होत नाही, हेही स्पष्ट करावे लागेल.

विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवडी जाणून घेण्यासाठी कलचाचण्या घेण्याचा प्रस्ताव आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशापुरतेच करिअरचे पर्याय मर्यादित न ठेवता इतर पर्यायांचीही माहिती देण्याची तरतूद आहे.

शैक्षणिक कामगिरीनुसार विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यासही बंदी प्रस्तावित आहे. अशा गटांमुळे विद्यार्थ्यांवरील दबाव वाढून त्यांच्या

मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे मसुद्यात नमूद आहे. गंभीर तक्रारींवर २४ तासांत कारवाई

तक्रार निवारणासाठी औपचारिक यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळासंदर्भातील कायद्यांतर्गत तक्रारी आल्यास २४ तासांत कारवाई करावी लागेल.

कोचिंग सेंटर व्यवस्थापनाने संबंधित माहिती आणि सीसीटीव्ही चित्रण तातडीने सरकारला उपलब्ध करून द्यावे लागेल. भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्ह्याचा संशय असल्यास स्थानिक पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असेल.

उल्लंघन केल्यास ५० लाख रुपयांपर्यंत दंड

प्रस्तावित कायद्याचे उल्लंघन केल्यास किरकोळ गुन्ह्यांसाठी एक लाख ते पाच लाख रुपये, तर गंभीर उल्लंघनांसाठी दहा लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

किरकोळ उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. नोंदणी तात्पुरती स्थगित करणे, कायमस्वरूपी रद्द करणे किंवा कोचिंग सेंटर बंद करण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात.

एनईईटी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पाऊल

खासगी कोचिंग सेंटरच्या नियमनासाठी सरकारने हा प्रस्ताव आणला आहे. एनईईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात कोचिंग सेंटरच्या कथित भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रस्तावित कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल. मात्र, तो नेमक्या कोणत्या तारखेपासून लागू करायचा, याची स्वतंत्र अधिसूचना राज्य सरकारकडून काढण्यात येणार आहे.

आश्वासन देता येणार नाही…

१ कोचिंग सेंटरना १३ वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही. विद्यार्थ्यांना गुण किंवा क्रमांकाची हमी देणे, दिशाभूल करणारी आश्वासने देणे यावरही बंदी असेल.

प्रशिक्षक पदवीधर असणे आवश्यक असेल. ज्या 3 व्यक्तीविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल आहे, अशा व्यक्तीला कोचिंग सेंटरमध्ये नियुक्त करता येणार नाही.

शुल्कवाढीवर निर्बंध; सोडल्यास परतावा

कोचिंग सेंटरला विद्यार्थ्यांना शुल्काची पावती देणे बंधनकारक असेल. जाहीर केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारता येणार नाही. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्याचे शुल्क वाढवता येणार नाही.

विद्यार्थ्याने अभ्यासक्रम मध्येच सोडल्यास उर्वरित कालावधीच्या शुल्काचा प्रमाणानुसार परतावा दहा दिवसांत द्यावा लागेल.

आठवड्यातून एक सुट्टी आवश्यक

वर्ग खूप पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत घेता येणार नाहीत. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस सुटी देणे आवश्यक असेल. सुटीनंतर लगेच परीक्षा किंवा चाचणी घेणे टाळावे लागेल.

कॉलेजांशी ‘मैत्री’ चालणार नाही

मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरात कोचिंग सेंटर चालवता येणार नाही. तेथील शिक्षकांना कोचिंग सेंटरमध्ये नियुक्त करण्यासही मनाई असेल. शाळा-महाविद्यालयांशी कोणत्याही प्रकारचे एकत्रीकरण करण्यासही बंदी असेल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026

ताज्या बातम्या

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा