टीम मंगळवेढा टाईम्स |
आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्याच्या पद्धती आणि जागतिक दर्जाच्या कृषी व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्णसंधी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या राज्यपुरस्कृत योजना २०२६-२७अंतर्गत शेतकऱ्यांसाठी युरोप आणि चीन येथे परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या योजनेत जिल्ह्यासाठी पाच शेतकऱ्यांचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषी व्यवस्थापन तसेच जागतिक बाजारपेठेतील आधुनिक कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करता येणार आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

इच्छुक शेतकऱ्यांनी १७ ऑगस्टपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत गुणवत्ता शेतकऱ्यांना परदेश शेतीवारी करत आधुनिक शेती, उत्पादनाची वाढविण्याच्या पद्धती

तसेच जागतिक दर्जाच्या कृषी व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून सहभागी व्हावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांनी केले आहे.

१७ ऑगस्टपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, ५ शेतकऱ्यांना संधी
राज्यपुरस्कृत योजना २०२६-२७ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांसाठी युरोप व चीन येथे परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषी व्यवस्थापन आणि जागतिक बाजारपेठेतील आधुनिक कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करता येणार आहे.
या योजनेअंतर्गत शासनाकडून परदेश अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी १७ ऑगस्टपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












