मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दुकानातून खाऊ घेऊन घराकडे निघालेल्या एका आठ वर्षांच्या बालिकेस एका पाळीव कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला. याबाबत जाब विचारायला गेल्यानंतर बालिकेच्या आईलाच शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्कान जब्बार शेख आणि तिच्या आईवर (नाव नोंद नाही. रा. चांदबाबा मस्जिद शेजारी, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिस्मिल्ला महिबूब मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे.

बिस्मिल्ला यांची मुलगी अक्सा ही शनिवारी दुपारच्या सुमारास एका दुकानात खाऊ घेऊन येत होती. त्या वेळी पाळलेल्या श्वानाने तिच्यावर हल्ला केला. तसेच उजव्या कंबरेवर चावा घेतला होता.

सहा महिन्यांचा कारावास
पाळलेल्या कुत्र्याला नियंत्रणात न ठेवणे किंवा त्याच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे या बाबींसाठी श्वानाच्या मालकाला जबाबदार आहे. दोषी आढळल्यास मालकाला किमान सहा महिन्यांचा कारावास किंवा दंड होऊ शकतो.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













