टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय चिमुरडीने अज्ञात कारणावरून शेतातील लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
या दुर्दैवी घटनेमुळे शिरनांदगी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिरनांदगी येथील रहिवासी आर्या वसंत खताळ (वय ११) या चिमुरडीने तिच्या घराच्या शेजारीच असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला अज्ञात कारणास्तव साडीने गळफास घेतला.

घटना निदर्शनास येताच आर्याचे चुलते यशवंत खताळ आणि कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
अवघ्या ११ वर्षांच्या निष्पाप मुलीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या धक्कादायक घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत. सहाय्यक फौजदार माळी यांच्याकडे या प्रकरणाचा अधिक तपास सुपूर्द करण्यात आला आहे.

चिमुरडीच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा
अवघ्या ११ वर्षांच्या आर्याच्या अशा अचानक जाण्याने खताळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस तपासात या आत्महत्येमागचे गूढ उकलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














