mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 3, 2026
in मंगळवेढा, सोलापूर
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

राज्य शासनाच्या ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेत मंगळवेढा पोलिस ठाण्याने सोलापूर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

गेल्या दहा वर्षांत (२०१६ ते ३० मे २०२६ या काळात) विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या तब्बल १२३ व्यक्तींचा यशस्वी शोध लावण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले आहे.

या कामगिरीमुळे अनेक वर्षांपासून ताटातूट झालेल्या शेकडो कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत.

​महिला पोलिस उपनिरीक्षक डॉ. आरती कणिरे यांनी विशेष पुढाकार घेत या मोहिमेत ७३ महिला व ५० पुरुष अशा एकूण १२३ बेपत्ता नागरिकांचा शोध लावला.

सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

परराज्यातून आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर शोध

​बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, डॉ. आरती कणिरे आणि त्यांच्या पथकाने सीडीआर (CDR), लोकेशन ट्रॅकिंग आणि आधुनिक तांत्रिक तपासाचा कौशल्याने वापर केला.

या पथकाने थेट कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, लातूर, यवतमाळ आणि परभणी अशा विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन अत्यंत चिकाटीने शोध घेतला. या मोहिमेत पोलिस हवालदार श्रीराम ताटे व पोलिस अंमलदार राहुल सोनकर यांनीही मोलाचे योगदान दिले.

​’ऑपरेशन शोध’ एका नजरेत…

​एकूण शोधलेल्या व्यक्ती: १२३
​महिला: ७३ | पुरुष: ५०
​शोधकार्याचा कालावधी: २०१६ ते ३० मे २०२६
​प्रमुख कार्यक्षेत्र: कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र ​तपासाची प्रमुख साधने: सीडीआर, लोकेशन ट्रॅकिंग आणि हायटेक तांत्रिक तपास
​
पोलीस अधिकारी डॉ. आरती कणिरे यांचा ‘सिक्सर’

​मंगळवेढा पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून डॉ. आरती कणिरे यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘ऑपरेशन शोध’पूर्वीही त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे तपास करत ३५ बेपत्ता मुलींचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि धडाकेबाज कामगिरीमुळे मंगळवेढा पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

​ही केवळ ड्युटी नव्हे, सामाजिक बांधिलकी

​”बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे ही केवळ आमची कायदेशीर जबाबदारी नाही, तर ती एक मोठी सामाजिक बांधिलकी आहे. आधुनिक तांत्रिक तपास, टीमवर्क आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आम्ही १२३ कुटुंबांना त्यांचा हरवलेला आनंद परत मिळवून देऊ शकलो.”
— दत्तात्रय बोरीगिड्डे (पोलिस निरीक्षक, मंगळवेढा)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

‘रोड रेज’चा थरार! गाडीला कट का मारला?’ वादातून मंगळवेढ्यात तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण

November 16, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
Next Post
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला 'शेतकरी'च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

आता हे काय नवीन! हॉलमार्क ही सोने शुद्धतेची गॅरंटी नाही, ग्राहकांच्या विश्वासाला तडा; कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

November 17, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..