टीम मंगळवेढा टाईम्स।
कराड येथे उघडकीस आलेल्या गांजा तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणात कराड पोलिसांनी मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील बिरा महाराज उर्फ बिरा अंतू मासाळ याच्यासह सात जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब), २०(ब)(२) अंतर्गत ८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान कराड पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोरख जिजाबाई पवार (वय ५६, कराड), शुभम अनिल पानसकर (वय २९, मल्हारपेठ), सोहम अशोक जाधव (वय ३६, मल्हारपेठ), रजाक उस्मान कच्ची (वय ५८, कराड),

बिरा उर्फ महाराज अंतू मासाळ (वय ४३, गोणेवाडी, ता. मंगळवेढा), रामेश्वर बिरा लोखंडे (वय २७, गोणेवाडी, ता. मंगळवेढा) आणि शरद भावुसाहेब पवार (वय २७, वाकीघेरडी, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.

कराड पोलिस आरोपींकडे गांजा तस्करीच्या साखळीबाबत कसून चौकशी करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे मंगळवेढा व परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भक्तांना मोठा धक्का
बिरा महाराज हे मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीच्या बाजीबाबा देवस्थानचे मठाधिपती असून अमावस्या व दर शनिवारी सायंकाळी त्यांचा दरबार भरत असे. करणी भूतबाधा काढण्यासाठी प्रपंचींक अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. मात्र आपण ज्याच्या पायावर नतमस्तक होतो. तोच महाराज गांजा तस्करीत सापडल्याने भक्तांना मोठा धक्का बसला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









