टीम मंगळवेढा टाईम्स ।
बदलत्या काळात इंग्रजीचे महत्त्व असले, तरी आपली मातृभाषा आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे परखड प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय भुसे यांनी केले.
डोंगरगाव (ता. मंगळवेढा) येथे मंगळवार, दि. १६ जून रोजी सकाळी १० वाजता वीर इंटरनॅशनल अकॅडमीच्या भव्य उद्घाटन प्रसंगी ते प्रास्ताविक भाषणात बोलत होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन
कार्यक्रमाची सुरुवात संगम विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र नलावडे व इतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आली.

यानंतर ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून अकॅडमीचा रीतसर शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव मोरे हे होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील बदल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आपले मनोगत व्यक्त केले.

यामध्ये राजेंद्र नलावडे (मुख्याध्यापक, संगम विद्यालय), तुकाराम मेटकरी, गोपाळ हेंबाडे, देव पारकर, प्रा.फटे सर, कवी लक्ष्मण हेंबाडे, सतीश दत्तू, संपादक समाधान फुगारे या सर्वच वक्त्यांनी अकॅडमीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
डोंगरगाव येथील या शैक्षणिक सोहळ्यासाठी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी माजी सरपंच यशवंत आकळे, सचिन आकळे, संभाजी हेंबाडे ग्रामपंचायत सदस्य मधू मोरे, माजी सदस्य अमोल मेटकरी, अनिल मोरे, चेअरमन बिरदेव चौगुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान इंगळे, सुंदर सूत्रसंचालन आणि आभार कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन बंडू माळी सर यांनी केले.

तर उपस्थितांचे आभार वांढरे सर यांनी मानले. डोंगरगाव आणि पंचक्रोशीतील पालकांनी या नव्या शैक्षणिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












