mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2026
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

टीम मंगळवेढा टाईम्स । ​सांगोला | बाळासाहेब झिंजुरटे

सहकार, उद्योग, अर्थक्रांती आणि धवलक्रांतीच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण करणारे सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक व ‘एल के पी मल्टीस्टेट’चे चेअरमन उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा अभिष्टचिंतन सोहळा सांगोला येथील सूर्योदय बँक्वेट हॉलमध्ये हजारो मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

​या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या ‘रक्तदान सप्ताहा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ५११ रक्तदात्यांनी रक्तदान करत या उपक्रमाची यशस्वी सांगता केली.

​दोन राज्यांत ‘रक्तदान सप्ताह‘ संकल्पना

​दरवर्षी वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची सूर्योदय समूहाची परंपरा आहे. मात्र, यंदा ही संकल्पना अधिक व्यापक करत ‘रक्तदान सप्ताह’ राबविण्यात आला.

‘एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील एकूण ४३ शाखांच्या माध्यमातून विविध स्तरांवर रक्तदान शिबिरे घेण्यात आली. या कामी ‘रेवनील ब्लड बँक’ ग्रुपने उत्कृष्ट नियोजन केले होते.

​रक्तदानाचे महत्त्व:

“रक्त कुठेही कृत्रिमरीत्या तयार होत नाही. एका रक्तदात्याच्या रक्तामधून तांबड्या पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स असे तीन घटक वेगळे करून तीन गरजूंचे प्राण वाचवता येतात. तसेच नियमित रक्तदानाने हृदयविकाराचा धोका कमी होतो,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

​सामाजिक बांधिलकी आणि देणगी

​सूर्योदय उद्योग समूह कायमच वृक्षारोपण, नेत्ररोग व स्त्रीरोग निदान शिबिरे, महिलांसाठी तीर्थयात्रा, जलसंधारण आणि अन्नदान यांसारखे लोकोपयोगी उपक्रम राबवत असतो. याच सामाजिक बांधिलकीतून अनिलभाऊ इंगवले यांनी आपल्या वाढदिवशी, गरजू व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या ‘आपुलकी प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेला ११,०००/- रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली.

​राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

​सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या सोहळ्याला सांगोला तालुका, जिल्हा आणि राज्यभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली.

​दूरध्वनीद्वारे शुभेच्छा: सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार एड. शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दूरध्वनीवरून आपले शुभसंदेश पाठवले.

​प्रत्यक्ष उपस्थित मान्यवर:

भाजपा नेते चेतनसिंह केदार, जि.प. सदस्य अतुल मालक पवार, सांगोला पं.स. सभापती सुदर्शन इंगवले, जि.प. सदस्य किरणभाऊ पांढरे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, सौ. वैशालीताई घुगे, मंगळवेढ्याचे माजी सभापती संभाजी गावकरे, ‘लय भारी’ समूहाचे प्रमोददादा साळुंखे यांसह अनेक राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

​विठ्ठल भजनी मंडळाचा सत्कार ठरला लक्षवेधी

​वाढेगाव येथील विठ्ठल भक्त दीपक बंदरे यांच्या विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने संतांच्या वेशभूषेत अनिलभाऊंचा सत्कार करण्यात आला, जो सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला. उपस्थित सर्व शुभचिंतकांसाठी सूर्योदय बँक्वेट हॉल येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सूर्योदय उद्योग समूहाचे सह-संस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ. बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी तसेच एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय समूहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. वित्तीय संस्था व उद्योग सांभाळत सामाजिक भान जपणा-या सूर्योदय परिवाराचे व अनिलभाऊंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल इंगवले

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..