मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची तारीखही जवळ आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. मात्र आता राज्यातील शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील शाळा 15 जूनला सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विदर्भातील उष्णतेचा कहर लक्षात घेता या विभागातील शाळा 22 जून पासून सुरू होणार आहेत. सरकारने आपल्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

सरकारकडून पत्रक जारी
शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
यात शिक्षण विभागाने म्हटले की, उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सन 2026 ची उन्हाळी सुटी व

शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत संदर्भ क्र. 2 अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दि. 15 जून, 2026 पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.

सकाळच्या सत्रात शाळा भरणार
विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुषंगाने कळविण्यात येते की, अर्धाधिक दिवसांतील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरू नये यासाठी निर्देशानुसार येत आहे.

त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक 22 जून, 2026 पासून सुरू होतील.

तसेच दि. 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरतील व दि. 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेत भरतील. उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि. 15 जून, 2026 पासून नियोजित वेळेत सुरू होतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












