टीम मंगळवेढा टाईम्स । संपादक – समाधान फुगारे
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे, ती म्हणजे प्रशांत परिचारक. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परिचारक समर्थकांच्या आशा पल्लवित होत्या.
परिचारकांनी विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी मैदानात उतरावे, इतकेच काय तर प्रसंगी बंडखोरीचे हत्यार उपसावे, अशीही त्यांच्या काही कट्टर समर्थकांची सुप्त इच्छा होती.

मात्र, राजकीय भूकंप घडवण्याची क्षमता असतानाही प्रशांत परिचारकांनी अत्यंत संयमी पवित्रा घेतला. कोणतीही राजकीय खळबळ न उडवता त्यांनी ‘पक्षनिष्ठेचा मार्ग’ स्वीकारला. त्यामुळे सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. “तिकीट गेले, पण वजन वाढले”

बंडखोरांचा हिरमोड, जाणकारांकडून कौतुक
परिचारक यांनी बंडाची तलवार म्यान केल्यामुळे विरोधक आणि बंडाची वाट पाहणारे निराश झाले असले, तरी राजकीय जाणकारांच्या मते मात्र ‘संयमाचा डाव परिचारकांनी जिंकला’ आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षादेश शिरसावंद्य मानून त्यांनी घेतलेली माघार भाजप श्रेष्ठींच्या मनाला भिडली आहे. भाजप नेतृत्वाने त्यांच्या या ‘त्यागाची’ आणि ‘पक्षनिष्ठेची’ गंभीरतेने नोंद घेतल्याची खात्रीलायक चर्चा आता रंगू लागली आहे.

राजकीय वर्तुळातील सूर
“राजकारणात कधीकधी दोन पावले मागे जाणे म्हणजे माघार नसते, तर ती पुढच्या मोठ्या झेपची तयारी असते. परिचारकांनी सध्या तोच संयम दाखवला आहे. याचे मोठे ‘राजकीय व्याज’ त्यांना भविष्यात नक्कीच मिळेल अशी चर्चा सुरू आहे.

मंगळवेढा ते सोलापूर एकच चर्चा…
सध्या पंढरपूर, मंगळवेढा ते थेट सोलापूर जिल्ह्यापर्यंत परिचारकांच्या या भूमिकेचे कौतुक आणि विश्लेषण सुरू आहे. पक्षासाठी दिलेला हा त्याग परिचारकांना भविष्यात सत्तेच्या कोणत्या मोठ्या पदावर नेऊन बसवणार? आणि या संयमाचे ‘राजकीय व्याज’ भाजप नेतृत्व कधी आणि कसे फेडणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













