मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
तरुणांमध्ये बॉडी फुगवण्यासाठी व शारीरिक क्षमता वाढवण्याच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित मेफेन्टरमिन इंजेक्शनच्या बेकायदा विक्रीवर

करमाळा पोलिसांनी कारवाई करत १५० इंजेक्शनच्या बाटल्या व दुचाकी असा एकूण २ लाख ९ हजार १३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी दुपारी कर्जत रोडवर पाण्याच्या टाकीजवळ दोघे जण प्रतिबंधित औषधांची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने साध्या वेशात सापळा रचून या कारवाईत १५० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या.

या इंजेक्शनची किंमत ४९ हजार १३३ रुपये असून, आरोपींकडून दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा, पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,

अर्जुन गोसावी, मिलिंद दहीहांडे, अमोल कंदील, स्वप्नील शेरखाने यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














