मंगळवेढा टाईम्स न्युज।
कोल्हापूर आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत सरकार केवळ आणि केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. पण सरकारने एक गोष्ट ध्यानात ठेवावी—मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करू नये.
सरकारने तात्काळ हे गॅझेट प्रसिद्ध करावे, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा कडक आणि थेट इशारा मराठा आंदोलनाचे धगधगते निखारे मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.

माळशिरस येथील प्रमुख कार्यकर्ते धनाजी साखळकर यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील अत्यंत आक्रमक भूमिकेत बोलत होते.

कुणबी नोंदी मिळवा, अडवणूक केल्यास लोकप्रतिनिधींना धारेवर धरा
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आवाहन करताना जरांगे-पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने संघटित होऊन आपल्या कुणबी नोंदी शोधून काढल्या पाहिजेत आणि आपली प्रमाणपत्रे पदरात पाडून घेतली पाहिजेत.

जर महसूल विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी ही प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करत असतील, तर थेट तुमच्या भागातील आमदार आणि खासदारांकडे जाऊन जाब विचारा, त्यांच्याकडे तक्रारी करा.

ते पुढे म्हणाले की, समाजात शांतता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवायचा असेल, तर सरकारने सर्वसमावेशक धोरण राबवणे गरजेचे आहे. जर सरकारच यामध्ये राजकारण करणार असेल, तर समाज शांत बसणार नाही.
पश्चिम बंगालच्या निकालावर संशय: “नक्कीच काहीतरी गौडबंगाल.
पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाचा संदर्भ निघताच मनोज जरांगे-पाटील यांनी त्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले,
”तिथली परिस्थिती पाहता सगळी मते एकाच पक्षाला (भाजपला) कशी काय पडू शकतात? या निकालामध्ये नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे,
नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे
एकंदरीत, गॅझेटच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून, आता सरकार या इशाऱ्यावर काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












