mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 22, 2026
in राज्य
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळा आल्यासारखं वातावरण सध्या राज्यात तयार झालं आहे. दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी सकाळी ठिकठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.

अशीच स्थिती पुढील चार ते पाच दिवस काही दिवस कायम राहणार आहे. मंगळवारी महामुंबईमध्ये पेण, बदलापूर आणि कर्जत या ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

या भागांबरोबरच बहुतांशी भागांमध्ये पुढील काही दिवस असाच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.     सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 22 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे.

विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

हवामानातील हे बदल दिलासा देणारे असले तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘या‘ जिल्ह्याना यलो अलर्ट

सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळ्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासहीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. जळगाव, नाशिक, आहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमान, वाशीम, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे, पुण्यातील घाटमाथा, कोल्हापूर, साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडू शकतो. पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच 25 एप्रिलपर्यंत हा इशारा कायम असेल असं हवामान खात्याने मंगळवारी स्पष्ट केलं.

राज्यात मंगळवारी कुठे कुठे पडला पाऊस ?

सोलापुरात संध्याकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

सिंधुदुर्ग येथील कणकवली शहरासह परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. आठवडा बाजार असल्याने ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.

हिंगोली जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजली. शेतातील उभी ज्वारी आडवी झाली.

रायगड : पेण, कर्जत, बदलापूर आणि इतर परिसरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उन्हाळ्यात पावसाळा

संबंधित बातम्या

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
Next Post
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा