टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसेवेच्या नावाखाली गरजू रुग्णांची अडवणूक करणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. मंगळवेढा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली असून, रुग्णाच्या नातेवाईकाकडून लाचेची मागणी करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईच्या पायाच्या ऑपरेशनसाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’चा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात ही लाचेची मागणी करण्यात आली होती.

खरं तर ही योजना पूर्णपणे मोफत असतानाही, त्याचा फायदा करून देण्यासाठी डॉ. अरुणकुमार महिंद्रकर सह आरोग्य मित्र यांनी १०,००० रुपयांची मागणी केली होती.

तडजोड केली अन् जाळ्यात अडकले
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे १६,००० रुपयांपासून सुरू झालेली ही लाचेची मागणी तडजोडीनंतर ५,००० रुपयांवर आली होती. तक्रारदाराने यापूर्वी ६,००० रुपये दिले होते, मात्र उर्वरित रकमेसाठी तगादा लावल्याने अखेर एसीबीने सापळा रचून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला.

सरकारच्या मोफत आरोग्य योजनेतही डल्ला मारणाऱ्या या ‘पांढरपेशी’ भ्रष्टाचाऱ्यांच्या कृत्यामुळे मंगळवेढा परिसरात एकच खळबळ माजली आहे. लाच घेणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,

असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. सोलापूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











