टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने मंगळवेढा परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली आहे.
मंगळवेढा ते मरवडे रोडवरील प्रिया हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १८ लाख ४ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकी घटना काय?
काल दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:१० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हिरामण करंडे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला.

यावेळी काही आरोपी तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले, तर ११ ते १२ अनोळखी इसम पोलिसांची चाहूल लागताच वाहने सोडून पळून गेले.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे:
१) नवनाथ शिवाजी दंडवते (रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) – अड्डा चालक, २) गणेश नागनाथ गवळी (रा. भालेवाडी), ३) बापू मुरलीधर खराडे (रा. वडर गल्ली, मंगळवेढा), ४) अनिल सिद्धेश्वर डांगे (अड्डा चालक), ५) विष्णुपंत मुरलीधर वाकडे (अड्डा चालक), ६) गवळी (रा. भालेवाडी) – जागा मालक (ज्याने जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिली).

तसेच पळून गेलेले ११ ते १२ अनोळखी इसम.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण १८,०४,१७५ रुपये)
पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात रोकड आणि वाहने जप्त केली आहेत:

रोख रक्कम व मोबाईल: ८,४६० रुपये रोख आणि दोन महागडे मोबाईल (किंमत ३०,००० रु.).
चारचाकी गाड्या: दोन स्विफ्ट डिझायर आणि एक रेनॉल्ट ट्रिबर कार (एकूण ११.५० लाख रु.).
दुचाकी: बुलेट, शाईन, स्प्लेंडर, प्लॅटिना आणि ॲक्सेस अशा एकूण ७ मोटारसायकल.
इतर साहित्य: जुगाराचे साहित्य, ५२ पत्ते आणि विविध रंगांचे कॉइन्स.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खंडागळे करत आहेत.
दरम्यान, शहरात व परिसरातील सुरू असलेले जुगार अड्डे आता पोलीस अधीक्षक यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











