टीम मंगळवेढा टाईम्स|
‘जुगार खेळणारे झाले कंगाल आणि क्लबवाले झाले मालामाल’ असे विदारक चित्र सध्या मंगळवेढा शहरासह परिसरात पाहायला मिळत आहे.
शहराच्या विविध भागांत आणि परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे अनेक तरुण पिढी बरबाद होत असून, सामान्य नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, या अड्ड्यांना अभय कोणाचे? असा रोखठोक सवाल विचारला जात आहे.

जुगार अड्ड्यांचे चालक केवळ जुगारच खेळवत नाहीत, तर हरलेल्या तरुणांना पुन्हा खेळण्यासाठी खाजगी सावकारांकडून जादा दराने कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
या चक्रव्यूहात अडकलेला तरुण कर्जबाजारी होत असून, घरातील दागदागिने आणि मालमत्ता विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत.

मंगळवेढा शहरातील बायपास परिसर, मरवडे रोड यांसह अनेक मोक्याच्या ठिकाणी हे जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत.

दिवसाढवळ्या चालणाऱ्या या प्रकारांमुळे महिला आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना प्रशासन गप्प का?” असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा!
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन मंगळवेढ्यातील हे अवैध जुगार अड्डे तातडीने मुळासकट उखडून टाकावेत, अशी मागणी होत आहे.

सामान्य जनतेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, जर पोलिसांनी वेळीच हे अड्डे बंद केले नाहीत, तर नागरिक स्वतः रस्त्यावर उतरून हे अड्डे बंद करतील, असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













