mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 20, 2026
in क्राईम, सोलापूर
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।

सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेमधून दोन दिवसापूर्वी चोरीला गेलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका काल अखेर पोलिसांना मिळाल्या आहेत.

याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या एका विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याची चौकशी केली आहे. हा सर्व प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करणारा विद्यार्थीही दहावीत शिकत असून याच केंद्रावर त्याचा नंबर होता.

काल दहावीच्या भूगोलाच्या पेपरलाहा पठ्ठ्याही आला होता. मात्र, पेपर सुटल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने या सर्व प्रकार केल्याची कबुली दिली आहे.

इतर पेपर चांगले गेले, मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने पेपर चोरल्याती कबुली
इतर पेपर चांगले गेले मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने हे पेपर चोरल्याचे त्यांनी कबूल केले.

काल पोलिसांनी या अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकाची त्याच्या पालकांसमोर चौकशी केली असता त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. चोरी करण्यापूर्वी त्याने या केंद्रावरील स्ट्रॉंग रूमची चांगली पाहणी करुन घेतली होती.

पहाटे दोनच्या सुमारास हा मुलगा इलेक्ट्रिक बाइक वर इलेक्ट्रिक कटर घेऊन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने या स्ट्रॉंग रूमला लावलेले कुलूप कटरच्या साह्याने कट केले आणि आत जाऊन प्रश्नपत्रिका असलेली ट्रंक उघडली.

त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिका असलेले दोन गठ्ठे आणि तीन कोऱ्या उत्तर पत्रिका आपल्या सोबत घेऊन तेथून तो पुन्हा घरी आला. यातील एक गठ्ठा फोडून त्याने ती प्रश्नपत्रिका पाहिली होती.

50 प्रश्नपत्रिका 3 कोऱ्या उत्तर पत्रिका इलेक्ट्रिक कटर आणि इलेक्ट्रिक बाइक ताब्यात
आज पोलिसांनी या विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन बालकाकडून चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिका 3 कोऱ्या उत्तर पत्रिका इलेक्ट्रिक कटर आणि इलेक्ट्रिक बाइक ताब्यात घेतली आहे.

या प्रश्नपत्रिका चोरीनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. काल या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आजचा पेपर होणार का हा प्रश्न असताना रात्री उशिरा आज पेपर वेळापत्रकाप्रमाणे घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता.

काल त्यानुसार राज्यात सर्व ठिकाणी दहावीचा शेवटचा हा भूगोलाचा पेपर घेण्यात आला. पेपर चोरणाऱ्या या मुलाने या प्रश्नपत्रिकेचा गैरवापर केला नसल्याची खात्रीही पोलिसांनी चौकशी करून घेतली असल्याचे समजते. आता आज नियमानुसार या विधीग्रस्त संघर्ष बालकास बाल न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी पेपर चोरी

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
Next Post
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा