mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2026
in क्राईम, मंगळवेढा
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील एका ३० वर्षीय माजी उपसरपंचाला गावातीलच चौघांनी अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या मारहाणीत माजी उपसरपंचाची दीड तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली असून, हल्लेखोरांनी त्याचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईलही जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. ही घटना काल, शुक्रवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास घडली.

​नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी माजी उपसरपंच बबन सीताराम लोखंडे हे काल सकाळी आपल्या कामावर जात असताना

रांजणस्टॉप येथील दत्तात्रय जतकर यांच्या किराणा दुकानासमोर पोहोचले.

यावेळी काकासाहेब मधुकर लोखंडे, बिरुदेव शिवाजी लोखंडे, युवराज भिवा लोखंडे आणि ज्ञानेश्वर शिवाजी लोखंडे या चौघांनी त्यांना दुचाकीवरून येऊन अडवले.

​काकासाहेब लोखंडे आणि युवराज लोखंडे यांच्या हातात लोखंडी चेन होती, तर बिरुदेव लोखंडेच्या हातात केबल वायर होती. हल्लेखोरांनी बबन लोखंडे यांना शिवीगाळ करत “तू गावात भांडणे लावतोस का?” असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी बिरुदेवने केबलने, तर युवराज व काकासाहेब यांनी लोखंडी चेनने मारहाण करून जखमी केले.

​मोबाईल लुटला, जिवे मारण्याची धमकी
मारहाणीदरम्यान, काकासाहेब लोखंडे याने बबन लोखंडे यांच्या खिशातील ‘Vivo Y7’ कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. या झटापटीत बबन यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन तुटून गहाळ झाली.

परिसरातील दत्तात्रय जतकर आणि कुमार व्हनमाने यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी “पुन्हा आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन तेथून पलायन केले.

​पीडित बबन लोखंडे यांनी तात्काळ मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, वरील चौघांविरुद्ध मारहाण, लुटालूट आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपसरपंच बेदम मारहाण

संबंधित बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 25, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 25, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
Next Post
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना 'ही' चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

ताज्या बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 25, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू-वराची ‘ही’ माहिती छापणे बंधनकारक होणार

June 25, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 25, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..